जितकी कामाची वेळ कमी... तितके कर्मचारी जास्त दर्जेदार!

कर्मचाऱ्यांच्या क्षमतेचा जास्तीत जास्त वापर करून घेण्यासाठी अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांचे 'वर्किंग अवर्स' म्हणजेच कामाची वेळ जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न करतात... पण, एका नवीन संशोधनानुसार, कंपन्यांचा हा प्रयत्न फोल ठरतोय. 

Updated: Oct 7, 2015, 11:00 AM IST
जितकी कामाची वेळ कमी... तितके कर्मचारी जास्त दर्जेदार! title=

नवी दिल्ली : कर्मचाऱ्यांच्या क्षमतेचा जास्तीत जास्त वापर करून घेण्यासाठी अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांचे 'वर्किंग अवर्स' म्हणजेच कामाची वेळ जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न करतात... पण, एका नवीन संशोधनानुसार, कंपन्यांचा हा प्रयत्न फोल ठरतोय. 

कर्मचाऱ्यांचे कामाचे तास कसामान्यापेक्षा कमी असतील तर ते कमी वेळात जास्त दर्जेदार, फायदेशीर (प्रोडक्टिव्ह) काम करू शकतात, असं या संशोधनातून समोर आलंय. 

कामाच्या कमी वेळांमुळे कर्मचारी खुश राहतात आणि त्यामुळे त्यांची काम करण्याच्या क्षमतेलाही चालना मिळते. 'डेली मेल'मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, दिवसाला सहा तास काम करणारे कर्मचारी जास्त खुश असतात. सोबतच त्यांचा काम करण्याचा उत्साह आणि क्षमताही वाढलेल्या असतात.    

या रिसर्चमध्ये स्वीडनच्या FILIMUNDUS या अॅप डेव्हलपर कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या कामांच्या वेळेचा अभ्यास करण्यात आला. दिवसातून आठ तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची क्षमता तेवढी जास्त नसते, जेवढं सांगितलं जातं. शिवाय, दिवसातले आठ तास केवळ कामावर फोकस करणं प्रत्येकासाठी एक चॅलेंज असतं... जर तुमचा स्टाफ आनंदी असेल तर तुमची कंपनीही खुश राहील. 

उल्लेखनीय म्हणजे, सध्या यूकेमध्ये एखादा सामान्य कर्मचारी दिवसातले 8.7 तासांहून अधिक वेळ काम करतो. फ्रान्समध्ये मात्र कर्मचारीखूपच कमी म्हणजे दिवसातून 5.6 तास काम करतात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.