पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण, यामहिन्यात येतोय दुर्मिळ योग!

खगोलप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. एक दुर्मिळ असं दृश्य या महिन्यात पाहायला मिळणार आहे. 1982 नंतर पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण येतंय.

Updated: Sep 2, 2015, 04:31 PM IST
पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण, यामहिन्यात येतोय दुर्मिळ योग! title=

वॉशिंग्टन: खगोलप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. एक दुर्मिळ असं दृश्य या महिन्यात पाहायला मिळणार आहे. 1982 नंतर पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण येतंय.

27 सप्टेंबरला हा दुर्मिळ योग आलाय. दोन महत्त्वाचे दृश्य तेव्हा पाहायला मिळतील, एक संपूर्ण आणि मोठ्या आकारातील चंद्र आणि दुसरं चंद्रग्रहण... हे एक खग्रास चंद्रग्रहण असेल.

जेव्हा चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ येईल ते नेहमीच्या पौर्णिमेपेक्षा चंद्र तब्बल 14 पट मोठा आणि तेजस्वी दिसेल. याच मोठ्या चंद्राला जेव्हा ग्रहण लागेल म्हणजेच पृथ्वी चंद्र आणि सूर्याच्यामध्ये येईल. तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडेल आणि हे असेल खग्रास चंद्रग्रहण... चंद्र पूर्णपणे लाल दिसेल... जसा काही मंगळ... हाच दुर्मिळ योग 27 सप्टेंबरला पाहायला मिळणार आहे. 

रात्री 9 वाजून 7 मिनिटांनी या ग्रहणाला सुरूवात होणार असून पूर्ण ग्रहण 11.11 वाजता लागेल. EarthSky.org नुसार हे ग्रहण अमेरिका, युरोप, आफ्रिका आणि मध्य पूर्वेला दिसले. 

हे चंद्रग्रहण पाहणं विसरू नका कारण यानंतर असा योग 2033 मध्ये येणार आहे. 

 

नासानं शेअर केलेला व्हिडिओ - 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.