लंडन: ब्रिटनपासून स्पेनपर्यंत आणि सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकवर सध्या प्रेमाची एक गोष्ट खूपच चर्चेत आहे. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एबी तिचा बॉयफ्रेंड लियोनच्या बाबतीत किती पझेसिव्ह आहे, हे दिसलं तिनं केलेल्या एका कृती वरून.. लियोननं एक टी-शर्ट डिझाइन करवली ज्यावर लिहिलंय, ‘मी माझ्या गर्लफ्रेंडवर प्रेम करतो, मुलींनो माझ्यापासून दूर राहा.’
विशेष म्हणजे ही टी-शर्ट लियोनला एबीनं करायला सांगितली. तसंच मॅसेज नाही तर फोटोही या टी-शर्टवर आहे. त्याचा फोटो सोशल नेटवर्किंग साइटवर शेअर केलाय.
मिळालेल्या माहितीनुसार एबी आणि लियोन स्पेनच्या आयबीजा टूरवर गेले होते. टूरच्या तयारासाठी एबीनं लियोनसाठी एक टी-शर्ट ऑर्डर करवली होती. टी-शर्टवर जोडप्याचे चार फोटो आहे आणि त्यावर लिहिलंय, ‘मी माझ्या गर्लफ्रेंडवर प्रेम करतो, मी आयबीजाच्या मुलींचा राग करतो, म्हणून दूर राहा.’
प्रकरणातील गंमत म्हणजे, लियोननं टी-शर्टवर फक्त आयबीजा दूर दरम्यान घालण्यासाठी सांगितलं गेलं होतं. पण टी-शर्ट फेसबुकवर शेअर केल्यानंतर तब्बल 10 लाख लोकांनी लाईक केलंय. त्यामुळं आता एबीला भीती वाटतेय की, याचा उलटा परिणाम तर होणार नाही?.
एबी म्हणजे, इंटरनेटवर हा फोटो खूप जणांनी पाहिला. अनेक मुलींना हा फोटो आकर्षित करू शकतो. अनेक मुलींना चॅलेंज घेणं आवडतं. एबी आणि लियोनला 5 वर्षांची मुलगी सुद्धा आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.