मास्को : एका २२ वर्षीय पॉर्न स्टारने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली आहे, बलात्कारापासून वाचण्यासाठी तिने ही उडी मारल्याचं सांगण्यात येत आहे. चित्रपट निर्माता असल्याचं सांगून दोन जण तिच्या घरात घुसले, आणि तिचा शारीरीक छळ सुरू केला. ही रशियाची प्रसिद्ध पॉर्न स्टार आहे.
या त्रासापासून वाचण्यासाठी तिने थेट तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली आहे, यात ही पॉर्न स्टार गंभीर जखमी झाली आहे, तिच्या एका पायाला फ्रॅक्चर आहे, तिला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ही पॉर्न स्टार रस्त्यावर कोसळली तेव्हा ती रक्तबंबाळ झाली होती, तसेच तिचे कपडेही फाटले असल्याचं रस्त्यावरून जाणाऱ्या एका ५४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने सांगितलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.