आम्ही जे केलं ते योग्यच – तहरीक ए तालिबान

 पाकिस्तानच्या पेशावरमधल्या एका आर्मी शाळेत घुसून दहशतवादाच्या नंग्या नाचाची जबाबदारी तहरीक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेनं स्वीकारलीय. इतकंच नव्हे, तर आम्ही जे केलं ते योग्यच आहे, असा दावाही या संघटनेनं केलाय. 

Updated: Dec 17, 2014, 10:03 AM IST


फाईल फोटो

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या पेशावरमधल्या एका आर्मी शाळेत घुसून दहशतवादाच्या नंग्या नाचाची जबाबदारी तहरीक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेनं स्वीकारलीय. इतकंच नव्हे, तर आम्ही जे केलं ते योग्यच आहे, असा दावाही या संघटनेनं केलाय.  

पाकिस्तानच्या तालिबानचा प्रवक्ता मोहम्मद खुरासानी यानं एक विधान जाहीर केलंय. उत्तर वजीरिस्तान आणि खैबर प्रांतातील दहशतवाद्यांविरुद्ध केलेल्या कारवाईचा विरोध म्हणून हा हल्ला घडवून आणण्यात आला, असं खुरासानी यानं म्हटलंय. 


पेशावरच्या हल्ल्यात १३२ विद्यार्थी मृत्यूमुखी 

‘आमच्या कबील्यातली मुलं ही आमची मुलं आहेत... कबील्याच्या महिला आमच्या आया-बहिणी आहेत. गेल्या वर्षात जवळपास ६०० लोक मारले गेले... जे निर्दोष लोक मारले गेले त्यांचेही मृतदेहही छिन्न-विछिन्न झाले होते… पेशावरच्या हल्ल्यात मारले गेले ते सैनिक होते, त्यांनी स्वत:ला विनाशाकडे झोकून दिलं. कारण, ते आपल्या घरांमध्येच घायाळ व्हायला हवेत... जेव्हा तुम्ही तुमच्याच घरात घायाळ होतात तेव्हा तुम्हाला उमजतं... त्यांनी आमच्या घरांना जाळलं... आणि आम्ही त्यांच्या घरांना आगीच्या हवाली करण्यासाठी विवश झालो’ असं म्हणत खुरासानी यानं जराही पश्चाताप व्यक्त न करता उलट आपण जे केलं ते योग्यच होतं, असा निर्लज्ज दावा केलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.