निगबो, चीन : सरकत्या जिन्याबद्दल अनेकांना काही वर्षापूर्वी अप्रुप होतं आणि जरा भीतीही वाटत असे. या जिन्यावरून आपण पडणार तर नाही ना... जिना अचानक जोरात सुरू तर होणार नाही ना... असे अनेक प्रश्न जिन्यावर चढण्यापूर्वी येत होते.
पण असाच काहीसा प्रकार चीनमधील निगबो येथे घडला. एका सबवे स्टेशनमधून बाहेर पडणारे प्रवासी एस्कलेटरवर चढत होते. तो वर जाणारा जिना अचानक उलटा जोरात फिरायला लागला आणि वर जाणारे माणसे अचानक जोरात खाली फेकले गेले.
एखाद्या कनव्हेअर बेल्टवरून खाद्य पदार्थ ज्या वेगाने फेकली जातात तशी माणसे फिकली गेली.