'मुस्लिमांसाठी भारतासारखी दुसरी जागा नाही'

देशात असहिष्णुतेचं वातावरण असल्यानं माझ्या पत्नीला भीती वाटत होती आणि तिनं  हा देश सोडाय़ची इच्छा व्यक्त केली होती, या विधानामुळे आमीर खान वादात अडकलाय. त्याच्यावर सर्व स्तरांवर टीका होत असतानाच पाकिस्तानी लेखक तारिक फतेह यांनीही आमिरला टोला हाणलाय.

Updated: Nov 25, 2015, 10:50 AM IST
'मुस्लिमांसाठी भारतासारखी दुसरी जागा नाही' title=

मुंबई : देशात असहिष्णुतेचं वातावरण असल्यानं माझ्या पत्नीला भीती वाटत होती आणि तिनं  हा देश सोडाय़ची इच्छा व्यक्त केली होती, या विधानामुळे आमीर खान वादात अडकलाय. त्याच्यावर सर्व स्तरांवर टीका होत असतानाच पाकिस्तानी लेखक तारिक फतेह यांनीही आमिरला टोला हाणलाय. मुसलमानांसाठी भारतासारखी दुसरी चांगली जागा नसल्याचं ते म्हणालेत. देशातल्या मुस्लिम नेत्यांनी आणि विचारवंतांनीही आमिरच्या या विधानावर टीका केलीय.

पाहा, काय म्हटलंय त्यांनी नेमकं... 

दरम्यान, एमआयएमचे अध्यक्ष असादउद्दीन ओवेसी यांनी आमिरच्या वक्तव्याशी असहमती दर्शवलीय. भारत मुसलमानांचाही देश असून देश सोडून जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचं त्यांनी नमूद केलंय.  त्यामुळे त्यांनी आमिरला चपराक लगावली.

अधिक वाचा - असादुद्दीन ओवसी भडकलेत, आमिर नॉनसेंस बोलत आहे!

भारत हा मुसलमानांसाठी सर्वात चांगला देश असल्याचे भाजपचे नेते शहनवाज हुसैन यांनीही म्हणत आमिर खानला सल्ला दिलाय... कोणत्याही कटाचा शिकार होऊ नको. आमिरवर निशाणा साधत शहनावाज म्हटले की आमिर खान घाबरला नाही तो देशाला घाबरवतो आहे. अशा वक्तव्याने देशाची प्रतिमा खराब होते. आमिर खानने विसरले नाही पाहिजे की त्याला देशाने स्टार बनवले आहे. १२१ कोटींच्या देशाच्या एखादी घटना घडते, त्यामुळे आपल्या 'अतुल्य भारता'ची प्रतिमा खराब करणे योग्य नाही. मुसलमानांसाठी भारतापेक्षा चांगला देश असू शकत नाही. या देशाला सोडून कुठे जाणार?  जा ठिकाणी जाल त्या ठिकाणी असहिष्णुता तुमचा पाठलाग करेल. 

अधिक वाचा - मुसलमानांसाठी भारत सर्वात चांगला देश - भाजप

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.