ओबामांनी पाकिस्तानला खडसावलं

पाकिस्ताननं त्यांच्या देशात असलेल्या दहशतवादी संघटनांचा खातमा करण्यासाठी अधिक कडक पावलं उचलावीत

PTI | Updated: Jan 24, 2016, 05:16 PM IST
ओबामांनी पाकिस्तानला खडसावलं title=

वॉशिंग्टन : पाकिस्ताननं त्यांच्या देशात असलेल्या दहशतवादी संघटनांचा खातमा करण्यासाठी अधिक कडक पावलं उचलावीत, असा सज्जड दम अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी दिला आहे.  

पठाणकोटमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचीही ओबामांनी निंदा केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारत दहशतवादी हल्ले सहन करत आहे. पठाणकोट हल्लाही त्याचंच उदाहरण आहे, असं ओबामा म्हणालेत.

2014मध्ये पेशावरच्या मिल्ट्री स्कूलवर हल्ला झाला, त्यानंतर पाकिस्ताननं दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ले केले, हेच योग्य धोरण आहे.पण पाकिस्ताननं आणखी कडक पावलं उचलावीत अशा शब्दांमध्ये ओबामांनी पाकिस्तानल खडसावलं आहे. 

पाकिस्ताननं अशा संघटनांवर कारवाई करुन दहशतवाद संपवण्याबाबात आपण गंभीर आहोत, हे जगाला दाखवून द्यावं, असा सल्लाही ओबामांनी नवाज शरिफ यांना दिला आहे. 

ओबामांकडून मोदींचंही कौतूक

पीटीआयला दिलेल्या या मुलाखतीत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रशंसा केली आहे. पाकिस्तानात जाऊन नरेंद्र मोदींनी नवाज शरिफांशी दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चा केली हे कौतुकास्पद आहे. असं ओबामा म्हणालेत.