फोटोतील या लहानगीला कोणत्या भीतीने पछाडलंय

फोटोत दिसणारी ही सिरियाची मुलगी अवघ्या चार वर्षांची आहे, सुरूवातीला फोटो पाहून सर्वच काही कळणार नाही. हजारो लोकांनी हा फोटो आपल्या फेसबुक आणि ट्वीटर पेजवर शेअर केलाय.

Updated: Mar 31, 2015, 09:39 PM IST
फोटोतील या लहानगीला कोणत्या भीतीने पछाडलंय title=

गाझा : फोटोत दिसणारी ही सिरियाची मुलगी अवघ्या चार वर्षांची आहे, सुरूवातीला फोटो पाहून सर्वच काही कळणार नाही. हजारो लोकांनी हा फोटो आपल्या फेसबुक आणि ट्वीटर पेजवर शेअर केलाय.

सिरियाच्या या अवघ्या चार वर्षाच्या मुलीने, सरेंडर करण्यासाठी हात वर केले आहेत. पण या फोटोमागची खरी स्टोरी आहे तरी काय? सुरूवातीला फोटो पाहून सर्वच काही कळणार नाही, या फोटोला ट्वीटरवर 11 हजार वेळेस रिट्वीट करण्यात आलंय.

या लहानगीच्या डोळ्यातील भीती तुम्हाला पाहता येतेय का?, तुमच्यासमोर एखादी बंदूक धरून कुणी उभं राहिलं तर?, तशीच स्थिती या मुलीची झालीय, या चार वर्षाच्या मुलीच्या मनात दहशतवादाने एवढं घर केलंय की, टेलीफोटो लेन्सचा कॅमेरा तिच्याकडे फोटो काढण्यासाठी सरसावला आणि लहानगीने कॅमेऱ्यासमोरच सरेंडर केलं. ओस्मान सर्गिली याने हा फोटो काढला आहे.

फोटोजर्नलिस्ट नाडीया अबू शाबेनने या फोटो सुरूवातीला ट्वीट केला. हा फोटो बनावट असल्याचंही सुरूवातीला सांगण्यात आलं, पण स्थानिका दैनिकात छापून आल्याची कात्रणही समोर आली आहेत. ही चार वर्षाची मुलगी ह्युडीया आहे, हामापासून दीडशे किलोमीटर अंतरावर हा रेफ्यूजी कॅम्प आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.