फेसबूक मॅसेजमुळे समोर आले बॉयफ्रेंड आणि आईचे संबंध

२२ वर्षाची चेल्सीची भेट केविन स्कॉट या ३७ वर्षीय व्यक्ती सोबत झाली. दोघांमध्ये हळूहळू जवळीकता वाढत गेली आणि अफेअर सुरु झालं. चेल्सीने केविनबाबत तिच्या आईला सांगण्याचं ठरवलं पण केविन हा १५ वर्षाने तिच्यापेक्षा मोठा असल्याने आई नकार तर देणार नाही ना याची भीती तिच्या मनात होती. पण तरी तिने त्याची भेट तिच्या आईसोबत घालून दिली आणि चेल्सीच्या आईनेही या नात्याबाबत सकारात्मकता दाखवली.

Updated: May 1, 2016, 05:10 PM IST
फेसबूक मॅसेजमुळे समोर आले बॉयफ्रेंड आणि आईचे संबंध title=

लंडन : २२ वर्षाची चेल्सीची भेट केविन स्कॉट या ३७ वर्षीय व्यक्ती सोबत झाली. दोघांमध्ये हळूहळू जवळीकता वाढत गेली आणि अफेअर सुरु झालं. चेल्सीने केविनबाबत तिच्या आईला सांगण्याचं ठरवलं पण केविन हा १५ वर्षाने तिच्यापेक्षा मोठा असल्याने आई नकार तर देणार नाही ना याची भीती तिच्या मनात होती. पण तरी तिने त्याची भेट तिच्या आईसोबत घालून दिली आणि चेल्सीच्या आईनेही या नात्याबाबत सकारात्मकता दाखवली.

चेल्सी आता तिच्या भविष्याचे स्वप्न रंगवत होती. हळूहळू तिचे स्वप्न प्रत्यक्षात येण्यास सुरुवात झाली होती पण फेसबूकवरच्या एका मॅसेजने तिची पूर्ण लाईफच बदलून टाकली. केविनच्या फेसबूकवर एका महिलेचा मॅसेज आला आणि जेव्हा तिने हा मॅसेज ओपन करुन पाहिला तर तिच्या पायाखालची जमीनच सरकली, हा मॅसेज होता तिच्या आईचा ज्यामध्ये तिच्या आईने लिहिलं होतं की, केविन तू बेडवर खूपच शानदार आहेस.

चेल्सी तिच्या आईकडे गेली आणि याबाबत विचारना केली. तर आई अगोदर खोटं बोलली पण नंतर ते उघडकीस आलं. केविनला याबाबत विचारणा केली असता त्याने चेल्सीला मारहाण केली. चेल्सीने यानंतर आत्महत्येचा प्रयत्न केला पण तिच्य़ा एका मित्राने तिचे प्राण वाचवले.