मॅसच्युसेट्स : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची मुलगी साशा ओबामा एका रेस्टॉरंटमध्ये वेटरचे काम करतेय.
मीडिया रिपोर्टनुसार, १५ वर्षांची साशा उन्हाळी सुट्टीत मॅसच्युसेट्सच्या मार्थास विनेयार्ड येथील एका रेस्टॉरंटमध्ये लोकांना जेवण सर्व्ह करण्याचे काम करतेय.
बोस्टन हेराल्डच्या रिपोर्टनुसार, साशासोबत गुप्तहेर विभागाचे सहा एजंटही असतात. प्रसिद्ध झालेल्या फोटोमध्ये निळा टीशर्ट आणि कॅप घातलेली साशा रिसेप्शनवर काम करताना दिसतेय.
तिच्यासोबत काम करणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले, सुरुवातीला हे सहा लोक तिची का मदत करत आहेत हे आम्हाला समजत नव्हते. मात्र नंतर समजले की ती कोण आहे ते.
ओबामा कुटुंबियांचे हे आवडते रेस्टॉरंट आहे. जेव्हा ते या ठिकाणी येतात तेव्हा आवर्जून या रेस्टॉरंटला भेट देतात. साशा येथे चार तासांची शिफ्ट करते.