वॉशिंग्टन : ख्रिसमससाठी ओबामा सलग सातव्या वर्षी हवाईला जाणार आहेत, व्हाइट हाऊसकडून सांगण्यात आले.
अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा ख्रिसमसचा सण अध्यक्ष बराक ओबामा यावेळीही हवाई येथे सहकुटुंब साजरा करणार आहेत.
गोल्फ, शेव्ह आइस, हनौमा समुद्र किनाऱ्यावर फिरणे आणि ऍलन वाँग येथे रात्रीचे खास भोजन असा ओबामांचा सुटीतील कार्यक्रम असतो.
अमेरिकेचे प्रथम नागरिक आपल्या कुटुंबीयांसह १९ डिसेंबर रोजी वॉशिंग्टनहून ओआहू बेटावरील होनूलुलूकडे रवाना होणार आहेत. यापूर्वी ओबामा कुटुंबीय येथील कैलुआ शहरात राहिले होते.
पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या वैकिकी येथून कैलुआ अवघ्या ४५ मिनिटांच्या अंतरावर आहे.
मागील तीन वर्षांपासून दरवेळी ओबामा येथील समुद्रकिनारी ३५०० डॉलर प्रतिदिन भाडे असलेल्या एका हॉटेलमध्ये वास्तव्यास जातात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.