वॉशिंग्टन : अमेरिका आपल्या सशस्त्र सैन्यात ट्रांसजेंडर्सवर लावलेले सगळे निर्बंध काढून टाकणार आहे, अशी घोषणा अमेरिकेचे संरक्षणमंत्री अॅश्टन कॉर्टर यांनी केली आहे.
कार्टर यांनी पुढील सहा महिन्यांसाठी एक कार्यकारी गट बनवण्याची घोषणा केली आहे. हा गट पुढील सहा महिन्यांसाठी ट्रांसजेंडर्संना सैन्यात सामिल करण्यासाठीच्या धोरणांचा अभ्यास करेल.
ट्रांसजेंडर जवानांच्या संबंधातील संरक्षण विभागातील नियम खूप जुने झाले आहेत आणि यामुळे अनिश्चितता निर्माण होते.
जे कोणी देशाची सेवा करण्यासाठी उत्सुक आहेत तसंच सक्षम आहेत त्यांना सैन्यात येण्याचा पूर्ण आणि समान हक्क आहे. आपण सगळ्या लोकांशी समान व्यवहार केला पाहिजे तसंच सन्मान दिला पाहिजे. अमेरिकेच्या या धोरणाचे भरपूर स्वागत केले गेले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.