काठमांडू : नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. योसोबतच मागील काही दिवसांपासून सुरु असलेलं राजकीय संकट देखील संपुष्टात आलं आहे. ओली यांनी राष्ट्रपती बिद्या देवी भंडारी यांना आग्रह केला होता की त्यांनी संविधानातील कलम 305 लागू करत देशातील नव्या सरकारच्या गठनसाठी रस्ता मोकळा करावा.
आज सकाळीच अशा चर्चा होत्या की ओली संसदेत अविश्वास प्रस्तावाचा सामना नाही करणार आणि राजीनामा देतील. प्रचंड हे आता नेपाळचे नवे पंतप्रधान बनतील असं म्हटलं जातंय.