५० तासांनंतर ढिगाऱ्याखालून 'ती' सुरक्षित

 आता एक वेगळी बातमी...नेपाळच्या भूकंपात हजारोंचा बळी गेलाय. हजारो जण अजूनही ढिगा-याखाली अडकलेले आहेत.  यापैकीच एक असलेल्या माछा पोखारीनं मात्र मृत्यूवर मात केलीय. 

Updated: Apr 27, 2015, 09:20 PM IST
५० तासांनंतर ढिगाऱ्याखालून 'ती' सुरक्षित title=

काठमांडू :  आता एक वेगळी बातमी...नेपाळच्या भूकंपात हजारोंचा बळी गेलाय. हजारो जण अजूनही ढिगा-याखाली अडकलेले आहेत.  यापैकीच एक असलेल्या माछा पोखारीनं मात्र मृत्यूवर मात केलीय. 

परदेशी पर्यटक असलेली माछा पोखारी काठमांडूत फिरायला आली होती. मात्र भूकंपानं तिलाही लक्ष्य केलं. तिच्यावर काळानं घाला घातला खरा मात्रे तीची वेळ आलेली नव्हती.

यामुळं 50 तास ढिगा-याखाली असूनही माछा एनडीआरएफच्या जवानांना जिवंत सापडली. माछासारखे अनेक जण अडूनही ढिगा-याखाली अडकलेले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी एनडीआरएफ आणि इतर जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. 

पाहा व्हिडिओ 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.