पाकच्या सुपर मॉमने दिला पाच मुलांना जन्म

निसर्गात आपल्याला अद्भूत चमत्कार पाहायला मिळतात, असाच एक चमत्कार पाकिस्तानात झाला आहे. पाकिस्तानाच्या नैऋत्याला असलेल्या सुपर मॉमने एक नाही दोन नाही तर तब्बल पाच मुलांना जन्म दिला आहे. यात तीन मुली आणि दोन मुलांचा समावेश आहे.

Updated: Oct 25, 2013, 07:10 PM IST

www.24taas.com, एएनआय, पेशावर
निसर्गात आपल्याला अद्भूत चमत्कार पाहायला मिळतात, असाच एक चमत्कार पाकिस्तानात झाला आहे. पाकिस्तानाच्या नैऋत्याला असलेल्या सुपर मॉमने एक नाही दोन नाही तर तब्बल पाच मुलांना जन्म दिला आहे. यात तीन मुली आणि दोन मुलांचा समावेश आहे. गेल्या २० तारखेला या मातेने या पाच मुलांनांना जन्म दिला आहे.
पेशावरच्या हॉस्पिटलमध्ये सुपर मॉमने या पाच बाळांना जन्म दिला असल्याचे हॉस्पिटलच्या सूत्रांनी सांगितले आहे. याच पंचाळ्यांना जन्म देणारी आई मूळची मलाकंद या भागातील आहे.
अशा प्रकारे पाच बाळांना जन्म देणे हे खूप धोकादायक असते. आता पर्यंतच्या इतिहासात अशा प्रकारे पाच बाळांना जन्म देणे ही एक दुर्मिळ घटना मानली जाते. दरम्यान या पाचही बाळांची आणि आईची प्रकृती सामान्य आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.