वॉशिंग्टन : अमेरिकी संशोधन संस्था 'नासा'ने सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचा एक व्हिडिओ नुकताच शेअर केला आहे आणि आता तो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. अंतराळाचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांसाठी हा व्हिडिओ आता कमालीच्या उत्सुकतेचा विषय बनला आहे.
कोणत्याही ग्रहाचं चुंबकीय क्षेत्र हे साध्या डोळ्यांनी दिसत नाही. विशिष्ट तंत्राचा वापर करुन हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे.
यातून बाहेर पडणाऱ्या चुंबकीय रेषा एखाद्या दोरखंडाच्या गोळ्याप्रमाणे दिसतात. विविध चुंबकीय शक्तींना वेगळा रंग दिला गेला आहे. यातील रंगीत किरण सूर्यापासून दूर सूर्यमालिकेत जाणारे आहेत तर बाकी कमी अंतराच्या चुंबकीय क्षेत्राचे आहेत.
सूर्याबद्दल अजूनही संशोधकांना फारशी माहिती नाही. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी सूर्याचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. म्हणूनही हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरतो.