'ओबामा, माझ्या गर्लफ्रेंडला हात लावू नका'

राष्ट्रपती ओबामा सोमवारी शिकागोमध्ये मिड-टर्म निवडणुकीत मतदान करत होते... तेव्हाच त्यांच्या बाजुनं जाणाऱ्या एका व्यक्तीनं त्यांना 'आपल्या गर्लफ्रेंडला हात न लावण्याची' चेतावणी दिली... 

Updated: Oct 23, 2014, 06:56 PM IST
'ओबामा, माझ्या गर्लफ्रेंडला हात लावू नका' title=

वॉशिंग्टन : राष्ट्रपती ओबामा सोमवारी शिकागोमध्ये मिड-टर्म निवडणुकीत मतदान करत होते... तेव्हाच त्यांच्या बाजुनं जाणाऱ्या एका व्यक्तीनं त्यांना 'आपल्या गर्लफ्रेंडला हात न लावण्याची' चेतावणी दिली... 

त्याचं झालं असं की, माइक जोन्स नावाच्या या व्यक्तीची गर्लफ्रेंड ओबामा यांच्या बाजुच्याच बूथमध्ये आपलं मत टाकत होती...  आणि ओबामांना पाहताच ती जोरात हसली... तेव्हा ओबामांनीही तिला स्मितहास्य दिलं. 

तेव्हा माइकनं ओबामांच्या बाजुनं जातानाच 'मिस्टर प्रेसिडेन्ट, डोन्ट टच माय गर्लफ्रेंड' असं म्हटलं... तेव्हा, या वाक्यानं चकीत झालेल्या ओबामांनी आपली नजर वर उचलून 'खरं म्हणजे माझा असा कोणताही हेतू नव्हता' असं म्हणत उत्तर दिलं. 

मग, त्यांनी माइकच्या गर्लफ्रेंडला - ईया कूपरला म्हटलं... 'बघा... आपलेच लोक आपल्याला कसे अडचणीत आणतात त्याचं हे उत्तम उदाहरण आहे'.... यानंतर ओबामांनी तिला तिच्या बॉयफ्रेंडचं नाव विचारलं आणि 'तुम्ही जेव्हा घरी जाल तेव्हा तुमच्या मित्राशी याबद्दल जरुर बोला... माइक इतका मूर्ख आहे हे मला पटत नाहीय'... 

आणि हे म्हणता म्हणताच निघताना ओबामांनी ईयाला मिठी मारली आणि एक हलकासा किस घेतला... आणि म्हटलं... 'आता त्यालाही बोलायला संधी मिळेल... आता तो खरोखरच जळत असेल'... हा सगळा मजेशीर संवाद कॅमेऱ्यातही कैद झाला... 

यानंतर, एका मुलाखतीत बोलताना ईयानं 'माइक नेहमीच अशा काही तरी हरकती करत असतो पण... ओबामांनी या गोष्टीचं वाईट वाटून घेतलं नाही... आणि ओबामांनी मला किस केलं, त्याबद्दल मिशेलही मला माफ करतील अशी आशा आहे'.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.