शवागृहात 100 मृत महिलांसोबत त्यानं केला सेक्स

कधी-कधी एखादा माणूस माणुसकी विसरून कोणत्या हद्दीपर्यंत जाऊ शकतो, याचंच एक धक्कादायक उदाहरण समोर आलंय... हे हकीगत ऐकून तुमच्याही अंगावर काटे उभे राहतील. 

Updated: Aug 19, 2014, 01:04 PM IST
शवागृहात 100 मृत महिलांसोबत त्यानं केला सेक्स title=

न्यूयॉर्क : कधी-कधी एखादा माणूस माणुसकी विसरून कोणत्या हद्दीपर्यंत जाऊ शकतो, याचंच एक धक्कादायक उदाहरण समोर आलंय... हे हकीगत ऐकून तुमच्याही अंगावर काटे उभे राहतील. 

अमेरिकेत ही धक्कादायक घटना उघडकीस आलीय. अमेरिकेच्या ओहियो भागातील एका शवगृहातील एका कर्मचाऱ्यानं तब्बल 100 महिलांच्या मृतदेहाबरोबर सेक्स केल्याची कबुली दिलीय. मीडियामध्ये आलेल्या रिपोर्टमधून ही माहिती मिळतेय. 

वर्तमानपत्र ‘न्यूयॉर्क डेली न्यूज’मध्ये रविवारी प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, हेमिल्टन निवासी केनेथ डगलस यानं 1976 ते 1992 या कार्यकाळात तब्बल 100 महिलांच्या मृत शरीरासोबत सेक्स केल्याची कबुली दिलीय. 

डगससनं दिलेल्या माहितीनुसार, प्रेतांसोबत सेक्स करण्याअगोदर तो खूप दारू पीत होता तसंच मादक पदार्थांचंही सेवन करत होता. प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान डगलसनं न्यायालयासमोर ही कबुली दिलीय. ‘मी केवळ माझी पॅन्ट काढून प्रेतांवर झोपत असे’ असंही त्यानं म्हटलंय. पण, आपण जेव्हा नशेशिवाय कामाला जात होतो तेव्हा मात्र असं कृत्य करत नव्हतो, असंही त्यानं म्हटलंय. 

डगलसनं या दरम्यान गळा दाबून मारून टाकलेल्या तसंच सहा महिन्यांच्या गर्भवती महिलांच्या प्रेतासोबतही सेक्स केल्याची कबुली दिलीय. 

महत्त्वाचं म्हणजे, डगलसच्या या घृणास्पद कृत्याची तक्रार त्याच्याच पत्नीनं केली होती. त्यानंतर, एका महिलेच्या प्रेतात मिळालेल्या वीर्याच्या डीएनए चाचणीनंतर या घटनेला पृष्टी मिळाली.

डगलसच्या या अघोरी कृत्याची शिकार ठरलेल्या, एका मृत महिलेच्या खूनाचा आरोप ठेवण्यात आलेल्या आरोपीनं आरोपांना नकार दिला होता. आपण त्या महिलेवर बलात्कार केला नसल्याचं या आरोपीनं म्हणत न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यानंतर झालेल्या डीएनए टेस्टनंतर डगलसचं हे भयंकर कृत्य समोर आलं.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.