मायदेशात पैसे पाठवण्यात 'एनआरआय' 'नंबर वन'वर!

परदेशात स्थलांतरित झालेले भारतीय (एनआरआय - अनिवासी भारतीय) जगातून सर्वांत अधिक पैसे स्वदेशात पाठवतात. विश्व बँकेनं दिलेल्या माहितीनुसार, स्थलांतरित भारतीयांनी यावर्षी तब्बल ७२ अरब डॉलर भारतात पाठवले आहेत.... तर या यादीत ६४ अरब डॉलर पाठवण्यारं चीन दुसऱ्या क्रमाकांवर आहे.

Updated: Dec 19, 2015, 06:12 PM IST
मायदेशात पैसे पाठवण्यात 'एनआरआय' 'नंबर वन'वर! title=

वॉशिंग्टन : परदेशात स्थलांतरित झालेले भारतीय (एनआरआय - अनिवासी भारतीय) जगातून सर्वांत अधिक पैसे स्वदेशात पाठवतात. विश्व बँकेनं दिलेल्या माहितीनुसार, स्थलांतरित भारतीयांनी यावर्षी तब्बल ७२ अरब डॉलर भारतात पाठवले आहेत.... तर या यादीत ६४ अरब डॉलर पाठवण्यारं चीन दुसऱ्या क्रमाकांवर आहे.

तर ज्या देशातून सर्वाधिक पैसे दुसऱ्या देशात 'ट्रान्सफर' होतात तो देश म्हणजे अमेरिका... इतर देशांतून इथं स्थायिक झालेल्यांनी २०१४ मध्ये अमेरिकेतून ५६ अरब डॉलर आपल्या देशात पाठवले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सौदी अरेबियामधून भारतात ३७ अरब डॉलर तर रशियामधून भारतात ३३ अरब डॉलर पाठवण्यात आलेत. यावर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थलांतरित झालेल्यांची संख्या २५ कोटींपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. ही स्थलांतरीतांची सर्वात मोठी संख्या असल्याचं सांगण्यात येतंय.  

'मायग्रेशन अॅन्ड रेमिटेन्स फॅक्‍ट बुक २०१६'नं दिलेल्या माहितीनुसार, वेगानं विकास करणाऱ्या देशांमध्ये इतर देशांतून अधिक लोक कामाच्या शोधार्थ येताना दिसत आहेत.  

विश्व बँकनं आपल्या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवाशांची संख्या वाढून सर्वात अधिक म्हणजेच २५ करोडच्या पुढे जाऊ शकते... कारण लोक आर्थिक संधीच्या शोधात एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतर करत आहेत.
 
जलद गतीनं प्रगती करणारे विकसनशील देश आता जगातील इतर विकसनशील देशांतील नागरिकांसाठी आकर्षणाचं केंद्र बनत आहेत.