पॅरिसमध्ये पंतप्रधान मोदींची परीक्षा

आजपासून सुरू होणाऱ्या पॅरिसमधल्या वातावरण बदलाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 150 देशांचे राष्ट्रप्रमुख पॅरिसमध्ये दाखल झाले आहेत. परिषदेच्या ठिकाणी फ्रान्सचे अध्यक्ष होलांदे यांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं. 

Updated: Nov 30, 2015, 06:01 PM IST
पॅरिसमध्ये पंतप्रधान मोदींची परीक्षा title=

पॅरिस : आजपासून सुरू होणाऱ्या पॅरिसमधल्या वातावरण बदलाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 150 देशांचे राष्ट्रप्रमुख पॅरिसमध्ये दाखल झाले आहेत. परिषदेच्या ठिकाणी फ्रान्सचे अध्यक्ष होलांदे यांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं. 

11 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या परिषदेत भारत. चीन अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनी या देशांच्या भूमिकेकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे.  2009 मध्ये कोपनहेग येथे झालेल्या परिषदेत भारत आणि चीन हे दोघं देश इतर विकसीत देशांच्या दादागिरीला सामोरे गेले होते. 

2009 नंतर 6 वेळा पर्यावरण बदलांवर नियंत्रण मिळवण्यासाठी परिषदा झाल्यात. प्रत्येक वेळी विकसनशील राष्ट्रांवर जबाबदारी ढकलून विकसीत देश हात वर करून मोकळे झालेत. 

सर्वांनी जबाबदारी घेऊन पर्यावरणाचं रक्षण करावं अशी भारताची भूमिका आहे. भारताच्या या भूमिकेकडे अफ्रिका खंड, दक्षिण आशिया आणि दक्षिण अमेरिकेतल्या काही देशांनी पाठिंबा दर्शवला आहे. पण अमेरिका आणि युरोप खंडातील विकसीत देशही मोदींच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवणार का याकडे सर्वांच लक्ष असणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.