बगदाद : आयएसआयएसचा दहशतवादी बगदादीनं 'मिस इराक' या स्पर्धेतील विजेच्या तरुणीला धमकी दिलीय. दहशतवादी संघटनेत सामील झाली नाही तर उचलून नेऊ, असं तिला धमकावण्यात आलंय.
दहशतवादी संघटना 'आयएसआयएस'चा म्होरक्या बगदादी इराकमध्ये झालेल्या ब्युटी कॉन्टेन्स्टमुळे चवताळलाय. बगदादीच्या नाकावर टिच्चून या स्पर्धेत 'मिस इराक' निवडण्यात आली. या स्पर्धेत विजेती ठरली ती शाएमा कासिम अब्देल रहमान...
उल्लेखनीय म्हणजे, १९७२ नंतर इराकमध्ये पहिल्यांदाच ही स्पर्धा पार पडली होती. या स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या ग्लॅमर गर्ल शाएमाला आता बगदादीकडून धमक्या येत आहेत. आयएसआयएसमध्ये सहभागी झाली नाही तर किडनॅप केलं जाईल, अशी धमकी बगदादीनं शाएमाला दिलीय.
कोण आहे शाएमा
२० वर्षांची शाएमा इकोनॉमिक्सची विद्यार्थीनी आहे. तिनं आपण बगदादीला घाबरत नसल्याची प्रतिक्रिया दिलीय. 'इराकच्या महिलांनाही आपली स्वत:ची एक ओळख आहे... आणि मी काहीही चुकीचं करत नाही त्यामुळे मला कुणाला घाबरायची गरज नाही' असं प्रत्यूत्तर तिनं बगदादीला दिलंय.
आयएसआयएसच्या धमक्या
इराकमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये १५० मुलींनी सहभाग नोंदवला होता. पण, कट्टरपंथियांच्या धमक्यांनंतर १५ स्पर्धकांनी माघार घेतली होती.
आयएसआयएसच्या म्हणण्यानुसार, मुस्लिम महिलांचं संपूर्ण शरीर कपड्यानं झाकलेलं असायला हवं, अन्यथा त्यांना ठार केलं जातं.