चमत्कार: या चिमुरड्यानं आपल्या मेंदूच्या व्यंगावर केली मात

चमत्कारी जॅक्सननं मेंदूच्या व्यंगावर मात करत एक वर्ष पूर्ण केलंय. लहानगा जॅक्सन हा फक्त नावानंच लढवय्या नाही तर प्रकृतीनं आहे. निसर्गानं त्याला दिलेल्या व्यंगावर मात करत तो जगतोय... दररोज त्याच्यात सुधारणा होतेय. डॉक्टरांनीही त्याच्याबद्दल आशा सोडली होती पण तो जगतोय... 

Updated: Sep 27, 2015, 11:58 AM IST
चमत्कार: या चिमुरड्यानं आपल्या मेंदूच्या व्यंगावर केली मात title=

मुंबई: चमत्कारी जॅक्सननं मेंदूच्या व्यंगावर मात करत एक वर्ष पूर्ण केलंय. लहानगा जॅक्सन हा फक्त नावानंच लढवय्या नाही तर प्रकृतीनं आहे. निसर्गानं त्याला दिलेल्या व्यंगावर मात करत तो जगतोय... दररोज त्याच्यात सुधारणा होतेय. डॉक्टरांनीही त्याच्याबद्दल आशा सोडली होती पण तो जगतोय... 

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जॅक्सनचा जन्म झाला. त्याला मायक्रोहायड्रेनलसेफली(Microhydranencephaly)नावाचं कधीही न बरं होणारं व्यंग आहे. त्याच्या आईवडीलांनी आपली स्टोरी शेअर केली कारण त्यांना इतरांना जॅक्सनची परिस्थिती दाखवायची होती आणि इतरांना जागरूक करायचं होतं. 

जॅक्सनचं डोकं हे सामान्यापेक्षा खूप लहान आहे. त्याचं डोकं चपटं अतिशय लहान आहे, पण याचा अर्थ असा नाही की, त्याला जगण्याचा अर्थ नाही. जॅक्सनच्या आईनं ब्रिटनीनं आपली नोकरी सोडून त्याची नीट काळजी घेण्याचं ठरवलंय. 

ब्रिटनी म्हणते, जॅक्शननं आपण किती मजबूत, स्मार्ट आणि स्पेशल आहोत हे दाखवून दिलंय. जॅक्शनच्या उपचारांसाठी आर्थिक मदत करण्याचं आवाहन त्याच्या पहिल्या वाढदिवशी त्यांनी केलं. 

पाहा व्हिडिओ - 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.