नरेंद्र मोदींची लोकप्रियता ओबामांनाही भारी

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकप्रियतेबाबत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनाही मागे टाकले आहे. जपानमधील लोकप्रिय नेते आणि पंतप्रधान शिंजो ऍबे यांच्यापेक्षाही मोदीच लोकप्रियतेच्याबाबतीत अधिक सरस असल्याचे दिसून आले. 

Updated: Dec 21, 2014, 09:32 PM IST
नरेंद्र मोदींची लोकप्रियता ओबामांनाही भारी title=

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकप्रियतेबाबत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनाही मागे टाकले आहे. जपानमधील लोकप्रिय नेते आणि पंतप्रधान शिंजो ऍबे यांच्यापेक्षाही मोदीच लोकप्रियतेच्याबाबतीत अधिक सरस असल्याचे दिसून आले. 

हार्वर्ड विद्यापीठातील "केनेडी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट'मधील अभ्यासकांनी जागतिक नेते आणि त्यांच्या प्रभावक्षेत्राचा सखोल अभ्यास केल्यानंतर त्यांच्या एकूण लोकप्रियतेचा आराखडाच सादर केला आहे.

'रिफलेक्‍शन्स ऑन सर्व्हे ऑफ ग्लोबल पर्सेप्शन्स ऑफ इंटरनॅशनल लिडर्स अँड वर्ल्ड पॉवर' नावाच्या अहवालात जगातील विविध नेत्यांच्या प्रभावाचा वेध घेण्यात आला आहे. यामध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदीच अधिक लोकप्रिय असल्याचे दिसून आले. 

हा अभ्यास अहवाल तयार करण्याआधी तीस देशांमधील नागरिकांची दहा प्रभावशाली व्यक्‍तीसंबंधीची मते जाणून घेण्यात आली. यातून काही आश्‍चर्यजनक निष्कर्ष संशोधकांच्या हाती लागले.

देशातील तब्बल 87.8 टक्‍के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजना मान्य असल्याचे सांगितले. मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा - 44.8 टक्‍के , ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमरून -  51.5 टक्‍के आणि जपानचे पंतप्रधान शिंजो ऍबे - 30.4 टक्‍के यांनाही मागे टाकले आहे.

 भारत, रशिया आणि चीनमधील बहुतांश लोकांनी आपला देश योग्य दिशेने वाटचाल करत असल्याचे मत नोंदवण्यात आलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.