मंगळयानाने पाठवले मरीनेरिस खोऱ्याचे ३डी फोटो

 भारताचा मार्स ऑर्बिटर मिशन मंगळयानाने मरीनेरिस खोऱ्याचे ३डी फोटो पाठवले आहे. मंगळयानाने मंगळ ग्रहावरील सर्वात मोठे खोरे असलेले व्हॅलिस मरिनेरिसचे थ्री डी फोटो पाठवले आहेत. 

Updated: Aug 19, 2015, 03:25 PM IST
मंगळयानाने पाठवले मरीनेरिस खोऱ्याचे ३डी फोटो  title=

नवी दिल्ली :  भारताचा मार्स ऑर्बिटर मिशन मंगळयानाने मरीनेरिस खोऱ्याचे ३डी फोटो पाठवले आहे. मंगळयानाने मंगळ ग्रहावरील सर्वात मोठे खोरे असलेले व्हॅलिस मरिनेरिसचे थ्री डी फोटो पाठवले आहेत. 

लाल ग्रह असलेल्या मंगळाचे १८५७ किलोमीटर उंचीवरून मंगळयाने आपल्या खास रंगीत कॅमेऱ्याने फोटो काढले त्याला ओपिर चस्मा म्हणतात. ओपिर चश्मा मंगळ ग्रहावरील सोलर सिस्टिम असलेले सर्वात मोठ्या खोऱ्याचा भाग आहे. 

व्हॅलिस मरीनेरिस सुमारे ५ हजार किलोमीटर लांबीचे खोरे आहे. यात अनेक डोंगरदऱ्या आहेत. ओपिर चश्मा ६२ किलोमीटर लांब आणि उंच डोंगरांनी घेरलेला आहे. 

मंगळयानाला ५ नोव्हेंबर २०१३ रोजी अंतराळ पाठविण्यात आले होते. यासाठी ४५० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. मंगळयानाला आंध्रप्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.