ओबामांनी दिल्या नेल्सन मंडेलांना वाढदिवसाच्या शुभेच्या!

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी नेल्सन मंडेलांना ९५ व्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या. माझे कुटुंब आणि अमेरिकेच्या तमाम जनतेकडून मिशेल आणि मी नेल्सन मंडेला यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.

Updated: Jul 18, 2013, 04:14 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शांतीदूत म्हणून ओळखले जाणारे मंडेला आज ९५ व्या वर्षांचे झाले आहेत.
'माझे कुटुंब आणि अमेरिकेच्या तमाम जनतेकडून मिशेल आणि मी नेल्सन मंडेला यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांना चांगले आरोग्य लाभो अशी प्रार्थना करतो' असं ओबामांनी म्हटलंय. 'मंडेलांचं उदाहरण पाहता आम्ही अशा व्यक्तीला सन्मान देतोय ज्यांनी आपल्या देशाला आणि लोकांना न्याय, समानता आणि स्वातंत्र्याचा रस्ता दाखवला' अशी आठवणही यावेळी ओबामांनी करून दिलीय.

वर्णभेदविरोधात लढणाऱ्या या महान नेत्याचा सन्मान म्हणून २००९ मध्ये अमेरिकेने त्यांचा जन्मदिवस 'मंडेला दिन' म्हणून घोषित केला होता. मंडेलाचे समानता, सलोखा आणि अखंड बांधिलकी यांसारखे अनेक गुण भावी पिढीने अनुकरण करण्यासारखे आहेत.

मंडेला गेल्या कित्येक दिवसांपासून फुफ्फुसाच्या आजारामुळे हॉस्पिटलमध्ये आहेत. ८ जूनला त्यांना प्रिटोरिया या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मंडेला साधारण २७ वर्ष कैदेत होते. त्यातील १८ वर्षे नेल्सन मंडेला यांना रोबन बेटावरील तुरुंगात ठेवण्यात आले होते.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.