पोलिसांना ठोसा मारणाऱ्या ‘स्पायडरमॅन’ला अटक

एका 25 वर्षीय स्पायडरमॅनला न्यू यॉर्क पोलिसांनी अटक केलीय. ही व्यक्ती स्पायडरमॅनचे कपडे घालून पहिले तिथं येणाऱ्या पर्यटक महिलांना त्रास देत होता आणि नंतर एका पोलिसाला मारत होता. 

Updated: Jul 28, 2014, 11:29 AM IST
पोलिसांना ठोसा मारणाऱ्या ‘स्पायडरमॅन’ला अटक title=

न्यू यॉर्क: एका 25 वर्षीय स्पायडरमॅनला न्यू यॉर्क पोलिसांनी अटक केलीय. ही व्यक्ती स्पायडरमॅनचे कपडे घालून पहिले तिथं येणाऱ्या पर्यटक महिलांना त्रास देत होता आणि नंतर एका पोलिसाला मारत होता. 

आरोपीचं नाव ज्युनिअर बिशप आहे. बिशप स्पायडर मॅनसारखे कपडे घालून तिथं उपस्थित पर्यटकांसोबत फोटो क्लिक करवत होता. एका महिलेनं बिशपला 1 डॉलर टिप दिली तर त्यानं ती घेण्यास नकार दिला. 

त्यानंतर बिशपनं महिलेला म्हटलं, मी फक्त 5, 10 किंवा 20 डॉलर घेतो. तिथं उपस्थित पोलिसानं हे पाहिलं आणि त्यानं महिलेला सांगितलं आपल्याला वाटतं तितकेच पैसे तुम्ही देऊ शकता. हे पाहून बिशपनं पोलिसाला म्हटलं, तुम्ही तुमचं काम करा आणि त्याच्यामध्ये आपला पाय आणू नका.  

यानंतर बिशप पोलिसासोबत वाद घालू लागलं. पोलिसानं जेव्हा त्याला अटक करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो पोलिसाला जोराचा ठोसा मारून पळून गेला. यानंतर पोलिसांनी बिशपला अटक केलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.