नवी दिल्ली: जगभरात मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूबाबतची आकडेवारी गुरूवारी यूनिसेफने प्रसारीत केली आहे. या आकडेवारीनुसार जगभरात रोज १२०० मुलं मलेरियामुळे मृत्युमुखी पडत आहेत. मात्र या आकडेवारीत २००० सालाच्या तुलनेत ४० टक्के घट झाली आहे.
संयुक्त राष्ट्राने जागतिक मलेरिया दिवसाच्या आधी 'फॅक्ट अबाऊट मलेरिया अॅंन्ड चिल्ड्रन'मध्ये ही आकडेवारी दिली आहे. जगभरात लहान मुलं आणि गर्भवती महिलांवर मलेरियाचा होणार प्रार्दुभाव दाखवणे, हा यामागील उद्देश आहे.
WHOच्या रिपोर्टनुसार मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूत जगभरात ४७ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. मलेरियामुळे मृत्यू होणाऱ्यांमध्ये ७८ टक्के पाच वर्षाखालील मुलांचा समावेश आहे. २०१३ मध्ये ५,८४,००० लोकांचा मलेरियामुळे मृत्यू झाला होता, ज्यात ९० टक्के लोक आफ्रिकी देशातील होते. तसेत दररोज १२०० पेक्षा जास्त मुले या रोगाचा शिकार होतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.