लाईव्ह टीव्ही शोमध्ये सिंहाची चिमुकलीवर झडप

वाघाचं किंवा सिंहाचं नाव घेतल्यानंतरही माणसं घाबरतात. पण जेव्हा तो समोर दिसतो तेव्हा तर चांगल्या चांगल्यांना घाम सूटतो. एका शोदरम्यान ही असंच काही घडलं. ज्यामुळे अनेकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं.

Updated: Aug 11, 2016, 02:01 PM IST

मुंबई : वाघाचं किंवा सिंहाचं नाव घेतल्यानंतरही माणसं घाबरतात. पण जेव्हा तो समोर दिसतो तेव्हा तर चांगल्या चांगल्यांना घाम सूटतो. एका शोदरम्यान ही असंच काही घडलं. ज्यामुळे अनेकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं.

एका लाईव्ह टीव्ही शोदरम्यान एक सिंहाचा बछडा दोन ट्रेनरसह तेथे होता. शोमध्ये एक महिला तिच्या लहान मुलीसह बसली होती पण अचानक या सिहांने त्या मुलीवर हल्ला केला. मुलगी घाबरली आणि जोर-जोरात रडू लागली. सिंहाने त्याच्या दातात मुलीचा कपडे धरुन ठेवलं होते. त्यानंतर ट्रेनरने तेथे येऊन त्या मुलीची सूटका केली.

पाहा व्हिडिओ