प्रसुती वेदना पुरूषांना अनुभवता येणार

 बाळाला जन्म देणारी ती माऊली धन्य असते. बाळा जन्म देताना ज्या वेदना होतात त्या पुरूषांना कळत नाही. पण आता त्या वेदना बाळाच्या वडिलांनाही अनुभविण्याची सुविधा चीनमधील एका हॉस्पिटलने करून दिली आहे. 

Updated: Nov 21, 2014, 09:00 PM IST
प्रसुती वेदना पुरूषांना अनुभवता येणार title=

शांगडोग :  बाळाला जन्म देणारी ती माऊली धन्य असते. बाळा जन्म देताना ज्या वेदना होतात त्या पुरूषांना कळत नाही. पण आता त्या वेदना बाळाच्या वडिलांनाही अनुभविण्याची सुविधा चीनमधील एका हॉस्पिटलने करून दिली आहे. 

या संदर्भातील मोफत सेशन पूर्व चीनमधील शांगडोग प्रांतातील आइमा मॅटर्निटी हॉस्पीटलमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. या संदर्भात १०० पुरूषांनी अशा वेदना सहन करण्यासंदर्भात करार स्वाक्षरी करून दिला आहे. यात बहुतांशी होणाऱ्या बाळाचे वडील होते पण याकडे एक थ्रील म्हणून पाहणारे ही काही होते. 

यासाठी पोटाखाली एक पॅड बांधून त्या द्वारे इलेक्ट्रीक शॉक देऊन वेदना निर्माण केल्या जातात. या वेदना पाच मिनिटांपर्यंत देण्यात येतात. नर्स या वेदनांची तीव्रता एक ते दहा अशा स्तरावर दिली जाते. 

साँग सिलिंग, हा तरूण आपल्या गर्लफ्रेंड सोबत या ठिकाणी आला होता. त्याने या अनुभवानंतर सांगितले की, असे वाटते की आपले हृदय आणि फुफुसे फुटून जातील. त्याला सातव्या स्तरापर्यंत वेदना देण्यात आल्या होत्या. 
या कृत्रिम वेदना या खऱ्या वेदनांशी जुळणे कठीण आहे. कारण बाळाला जन्म देणे हे या वेदनांपेक्षा अधिक असते असे या वेदना देणाऱ्या या नर्सने सांगितले.  पुरूषांनी या वेदना सहन केल्या तर त्यांना त्याच्या पत्नी किती वेदना सहन करून आपल्या बाळाला जन्म देतात हे समजू शकले. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.