वॉशिंग्टन : आयसीसकडील पैसे आता संपत चालले आहेत, आयसीस आर्थिक समस्यांचा सामना करत असल्याचं दिसतंय, कारण आयसीसच्या नव्या करप्रणालीनुसार, दाढी कापल्यास १०० डॉलर आणि फिट कपडे घातल्यास २५ डॉलरचा दंड लावण्यात येणार आहे.
स्थानिक वृत्तपत्र ‘आयएचएस इंक’ च्या विश्लेषणानुसार, आर्थिक स्थिती खराब झाल्याने इस्लामिक स्टेटने दंड आणि करात वाढ केली आहे. चेहऱ्यावरील पडदा दूर केला तर १० डॉलर दंड या आधी होता, तो आता वाढवण्यात आला आहे. सिगारेटचे पाकिट सापडल्यास ४६ डॉलरचा दंड ठेवण्यात आला आहे.