भारतीयांमध्ये परदेशी नोकरीची उत्सुकता घटली

एक काळ असा होता जेव्हा देशातील प्रत्येक तरुणाच्या डोळ्यांत परदेशात जाण्याची स्वप्नं होती... पण, आता मात्र हे चित्र बदलताना दिसतंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 8, 2014, 06:27 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
एक काळ असा होता जेव्हा देशातील प्रत्येक तरुणाच्या डोळ्यांत परदेशात जाण्याची स्वप्नं होती... पण, आता मात्र हे चित्र बदलताना दिसतंय. आंतरराष्ट्रीय आर्थिक अनिश्चितता असल्यानं भारतीय तरुण पश्चिमी देशांत जाण्यासाठी फारसे उत्सुक नसल्याचं एका सर्व्हेमध्ये समोर आलंय.
सध्या, भारतीय तरुण नोकरीसाठी पश्चिमी देशांत जाण्यासाठी कचरतात. ही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तर दुसरीकडे, अत्याधिक कार्यकुशल कर्मचाऱ्यांना भारतातच चांगल्या संधी प्राप्त होत असल्यामुळे ते स्वदेशात परतणं पसंत करत आहेत.
`टाईम्सजॉब्स डॉट कॉम`नं केलेल्या एका अध्ययनाप्रमाणे, `आर्थिक परस्थिती ढेपाळलेली असताना ४० टक्के भारतीय रोजगारासाठी पश्चिमी देशांत जाण्याअगोदर खूप सावधानीनं निर्णय घेत आहेत`. या सर्व्हेच्या निष्कर्षानुसार, अत्याधुनिक कार्यकुशल व्यावसायिकांना भारतातच चांगल्या संधी उपलब्ध झाल्यामुळे त्यांनी आपल्या घरचा रस्ता धरलाय.
३४ टक्के भारतीय आत्ताही नोकरीसाठी पश्चिमी देशांत जाण्यासाठी अनौत्सुक आहेत तर २६ टक्के व्यावसायात शिरण्याची संधी शोधत आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.