२०१६ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत होणार वाढ

भारतीय अर्थव्यवस्था ही इतर देशाच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत चांगली प्रगती करणारी अर्थव्यवस्था असेल असं ब्रिटेनमधील पीडब्लूसीच्या एका अहवालात म्हटलं आहे. २०१६ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ७.७ टक्क्यांनी वाढेल जी चीनच्या अर्थव्यवस्थेपेक्षा अधिक असेल.

Updated: Jan 10, 2016, 07:58 PM IST
२०१६ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत होणार वाढ title=

नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था ही इतर देशाच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत चांगली प्रगती करणारी अर्थव्यवस्था असेल असं ब्रिटेनमधील पीडब्लूसीच्या एका अहवालात म्हटलं आहे. २०१६ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ७.७ टक्क्यांनी वाढेल जी चीनच्या अर्थव्यवस्थेपेक्षा अधिक असेल.

जगातील जी 7 उद्यास येणाऱ्या अर्थव्यवस्था म्हणजेच चीन, भारत, जर्मनी, ब्रिटेन, फ्रान्स, इटली आणि कॅनडा यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ ही अधिक असेल.

२०१६ हे वर्ष ब्रिक्स देशांच्या अर्थव्यवस्थेसाठी चांगले नसेल पण याउलट भारतासाठी ते चांगलं ठरेल.