एकाच वेळी 20 दात उपटले; रुग्णाचा मृत्यू

एकाच झटक्यात एका महिलेच्या तोंडातून 20 दात उपटून काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरचं न्यूयॉर्कमध्ये निलंबन करण्यात आलंय. धक्कादायक म्हणजे, या प्रयत्नात रुग्णाला आपला जीव गमवावा लागलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 24, 2014, 01:04 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, न्यूयॉर्क
एकाच झटक्यात एका महिलेच्या तोंडातून 20 दात उपटून काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरचं न्यूयॉर्कमध्ये निलंबन करण्यात आलंय. धक्कादायक म्हणजे, या प्रयत्नात रुग्णाला आपला जीव गमवावा लागलाय.
व्यावसायानं डेन्टीस्ट असणाऱ्या भारतीय वंशाच्या डॉक्टर रश्मी पटेल या न्यूयॉर्कमध्ये प्रॅक्टीस करत होत्या. डॉ. रश्मी 17 फेब्रुवारी रोजी ‘जुडिथ गान’वर उपचार करत होत्या.
न्यूयॉर्क डेली न्यूजनं दिलेल्या माहितीनुसार, रुग्ण महिलेचे दात काढल्यानंतर त्याजागी पुन्हा नवीन दात बसवायचेही होते. परंतु, रश्मी यांनी रुग्ण महिलेच्या जबड्यातील 20 दात एकाच वेळी काढण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान रुग्ण महिला बेशुद्ध पडली.
या महिलेच्या जबड्यात पुन्हा दात बसवण्याआधीच डॉ. रश्मी यांच्या सहाय्यकानं त्यांना थांबण्यास सांगितलं आणि तो बाहेर पळाला... आणि त्यानंच आपत्कालीन सेवेला बोलावण्यासाठी 911 नंबर डाईल केला.
या प्रकरणात रुग्ण महिलेला आपला जीव गमवावा लागलाय. त्यामुळे, निष्काळजीपणाचा ठपका ठेवत डॉ. रश्मी पटेल यांचं लायसन्स 21 एप्रिल रोजी रद्द करण्यात आलंय. रश्मी यांना 2003 मध्ये लायसन्स देण्यात आलं होतं. डॉ. पटेल या इनफिल्ड आणि टोरिंग्टन अशा दोन ठिकाणी क्लिनिक चालवत होत्या.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.