www.24taas.com , झी मीडिया, न्यूजर्सी
बॉलिवूड नृत्यानं तिला मिळवून दिला न्यूजर्सीचा मुकुट... ती तरुणी मिस अमेरिका बनली असली तरी ती आहे भारतीय वंशाची... मिस अमेरिका या अमेरिकन सौंदर्यस्पर्धेत २४ वर्षांची नीना दावुलुरी या भारतीय युवतीनं विजय मिळवलाय. तिनं बॉलीवूड फ्यूजन नृत्य करून परिक्षकांना प्रभावित केलं.
अमेरिकेत मिस अमेरिका ही सौंदर्य स्पर्धा आयोजित करणार्याध संघटनेनं विविध वंशाच्या युवतींना ही संधी प्राप्त करून दिल्यामुळं मला हा सन्मान मिळाला असून मी अत्यंत आनंदात आहे, असं नीनानं सौंदर्यवतीचा मुकुट मिळाल्यानंतर घेतलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. नीनाला डॉक्टर व्हायचं असून मिस अमेरिका हा किताब मिळाल्यानं तिला ५० हजार डॉलरची शिष्यवृत्ती मिळणार आहे.
न्यूजर्सीमधील अटलांटिक सिटीमध्ये झालेल्या शानदार समारंभात तिला मिस अमेरिका हा किताब प्रदान करण्यात आला. या स्पर्धेत विविधतेतून सांस्कृतिक क्षमता हे मूल्य राबविण्यात आलं. अमेरिकेतील वास्तव्यात आपल्या संस्कृतीबद्दलचे अनेक गैरसमज दूर केले, असं नीनानं सांगितलं. माझे आई-वडील माझा विवाह ठरविणार काय, यासारखे प्रश्न अनेकवेळा विचारण्यात आले. आता मिस अमेरिका या नव्या भूमिकेअंतर्गत आपण विविधतेचा पुरस्कार करू, असंही ती म्हणाली.
मिस न्यूयॉर्क बनणारी मी पहिली भारतीय होते आणि मिस अमेरिका हा किताब मिळविणारीही मी पहिली भारतीय आहे. याचा मला अभिमान आहे, असं साश्रुनयनानं नीनानं सांगितलं. नीनानं स्पर्धेच्या अंतिम फेरीत फिक्या पिवळ्या रंगाचा अत्यंत मनमोहक असा इव्हिनिंग गाऊन परिधान केला होता. या स्पर्धेत अमेरिकेतील ५३ स्पर्धक होत्या. मिक कॅलिफोर्निया क्रिस्टल ली ही दुसर्याग क्रमांकावर आली, तर मिस ओक्लोहोमा किस्ली ग्रीसवल्ड तिसर्याध क्रमांकावर आली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.