भारतीय वंशाचे बॉबी जिंदाल अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत

भारतीय वंशांचे अमेरिकन राजकारणी बॉबी जिंदाल यांनी रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी आपलं नाव घोषित केलंय. 

Updated: Jun 25, 2015, 12:45 PM IST
भारतीय वंशाचे बॉबी जिंदाल अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत title=

वॉशिंग्टन : भारतीय वंशांचे अमेरिकन राजकारणी बॉबी जिंदाल यांनी रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी आपलं नाव घोषित केलंय. 

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच बॉबी जिंदाल यांच्या रुपानं पहिल्यांदाच भारतीय वंशांची व्यक्ती रिंगणात उतरलाय. 

जिंदाल सध्या ल्युझियाना प्रांताचे गव्हर्नर आहेत. अत्यंत आक्रमक नेते म्हणून जिंदाल यांची प्रतिमा आहे. रिपब्लिकन पक्षातूनचं ऱाष्ट्रध्यक्षपदासाठी जिंदाल यांच्याव्यतिरिक्त आणखी १२ जण शर्यतीत आहेत. 

२०१६ मध्ये होणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्य़क्षपदाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षातून हिलरी क्लिंटन यांची दावेदारी पक्की मानली जातेय. बॉबी जिंदाल यांना भारतीय आणि आशियाई वंशाच्या अमेरिकनं नागरिकांतून मोठा पाठिंब्याची अपेक्षा आहे. 

आपल्या पहिल्याच भाषणात त्यांनी स्वतःच्या पक्षातल्या सगळ्या उमेदवारी इच्छुकांची चांगलीच खरडपट्टी काढलीय. विशेष म्हणजे ज्या ओबामाकेअर या गरिबांसाठीच्या वैद्यकीय विमा योजनेला पाठिंबा देणारे जिंदाल हे एकमेव उमेदवार आहेत. याच मुद्द्यावर मोठा पाठिंबा मिळेल अशी त्यांची अपेक्षा आहे. 

न्यू ऑर्लिन्समध्ये झालेल्या पहिल्याच भाषणात त्यांनी अमेरिकन अर्थव्यवस्था, आणि परराष्ट्र धोराणावर आपली भूमिका स्पष्ट केली. जिंदाल यांना प्रत्यक्ष निवड़णुकीआधी आपल्याच पक्षातल्या १२ जणांचा पराभव करून सगळी रिपब्लिकन मतं आपल्या पदरात पडतील याची खात्री करून घ्यावी लागेल. त्यानंतर रिपब्लिकन आणि डेमोक्रॅकिट पक्ष नोंदणीकृत मतदारांव्यतिरिक्त अमेरिकन नागरिकांचा पाठिंबा मिळवावा लागणार आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात जिंदाल विरुद्ध  क्लिंटन असा सामना रंगणार आहे.

जिंदाल यांच्या कारकीर्दीवर एक नजर...
- 44 वर्षाचे बॉबी जिंदाल सध्या ल्युझियाना प्रांताचे गव्हर्नर आहेत
- अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत प्रथमच भारतीय वंशाची व्यक्ती
- याआधी जिंदाल यांनी पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून दोनदा प्रयत्न केला
- ल्युझियानाची अर्थव्यवस्था  रुळावर आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न महत्वाचे
- ओबामा केअरचं समर्थन करणारे जिंदाल हे एकमेव रिपब्लिकन नेते

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.