पाहा, हिलेरींचे भारताविषयीचे ई-मेल सार्वजनिक

 हिलेरी क्लिंटन यांचे ४ हजार ईमेल सार्वजनिक करण्यात आले आहेत. काँग्रेस प्रणित यूपीए सरकार भारतात असतांना भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांवरील हिलेरी यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून लिहिलेले हे ईमेल आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 3, 2015, 09:16 PM IST
पाहा, हिलेरींचे भारताविषयीचे ई-मेल सार्वजनिक title=

नवी दिल्ली :  हिलेरी क्लिंटन यांचे ४ हजार ईमेल सार्वजनिक करण्यात आले आहेत. काँग्रेस प्रणित यूपीए सरकार भारतात असतांना भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांवरील हिलेरी यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून लिहिलेले हे ईमेल आहेत.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने जवळ-जवळ ४ हजार ३६८ ईमेल जारी केले आहेत, यात २०० ईमेल असे आहेत, हे भारताच्या संदर्भात महत्वाचे मानले जात आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, तत्कालीन परराष्ट्र मंत्री एसएम कृष्णा, माजी संरक्षण मंत्री ए.के. एंटनी आणि माजी पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांची, अमेरिकेच्या तत्कालीन मंत्री हिलेरी क्लिंटन यांच्याशी चर्चा झाली होती. 

कोपेनहेगन जलवायु संमेलनादरम्यान ई-मेलने हिलेरी क्लिंटन यांना भारताचे तत्कालीन पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी लिहलंय, जयराम म्हणतात, ते  ७५ मिनिटांचं भाषण ऐतिहासिक होतं. जयराम रमेश यांना हिलेरी यांनी उत्तर दिलंय, हॅप्पी न्यू ईयर, नमस्ते, तुम्हाला सर्वांना २०१० साठी शुभेच्छा! संदेश पाठवल्याबद्दल खुप सारे धन्यवाद.

हिलेरी क्लिंटन यांनी असं शुभेच्छांच्या मागून सपाट उत्तर देऊन जयराम यांना पुढचा कोणताही विषय न काढू देता, हिलेरी यांनी पुढील विषयांना बगल दिली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.