मेक्सिकोच्या महिलेवर ४३,२०० वेळा झाला रेप, पाचव्या वर्षापासून झाले लैंगिक शोषण

 एखाद्या महिलेवर बलात्कार झाल्यावर ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या हादरून जाते, तिच्या मनाची स्थिती कोणी समजू शकत नाही. अमेरिकेच्या मॅक्सिको सिटीमध्ये राहणारी कार्ला जॅसिंटो हिच्यावर एक नाही दोन नाही तर ४३,२०० वेळा बलात्कार झाला आहे. हा खळबळजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर मानवी तस्करीचा वीभत्स चेहरा जगासमोर आला आहे. 

Updated: Nov 11, 2015, 03:39 PM IST
 मेक्सिकोच्या महिलेवर ४३,२०० वेळा झाला रेप, पाचव्या वर्षापासून झाले लैंगिक शोषण  title=

मॅक्सिको सिटी :  एखाद्या महिलेवर बलात्कार झाल्यावर ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या हादरून जाते, तिच्या मनाची स्थिती कोणी समजू शकत नाही. अमेरिकेच्या मॅक्सिको सिटीमध्ये राहणारी कार्ला जॅसिंटो हिच्यावर एक नाही दोन नाही तर ४३,२०० वेळा बलात्कार झाला आहे. हा खळबळजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर मानवी तस्करीचा वीभत्स चेहरा जगासमोर आला आहे. 

सीएनएन इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीशी बोलताना कार्लाने आपली व्यथा जगासमोर मांडली. तिच्यावर ४३,२०० वेळा बलात्कार झाला आहे. मानवी तस्करांच्या हातात पडल्यावर तिच्यावर दररोज अनेक वेळा बलात्कार झाले. कार्लाने सांगितले की दिवसातून ३० वेळा बलात्कार केला जात होता. कार्लाच्या या काहणीने मॅक्सिको सिटी आणि अमेरिकेसह जगभरातील मानवी तस्करीचा वीभत्स चेहरा उघड झाला आहे. 

कार्लाला लहान असतानाच तिच्या आईने सोडू दिले होते. कार्ला म्हणते, मी खूपच अस्थाव्यस्त कुटुंबाचा भाग होती. पाच वर्षांची असताना एका नातेवाईकाने माझे लैंगिक शोषण केले. तर १२ वर्षांची असताना एक तस्कर माझ्याशी प्रेमाने बोलला आणि मला एका भरधाव कारमध्ये बसवून घेऊन गेला. 

कार्ला त्यावेळी आपल्या मित्रांसोबत सब वे स्टेशनजवळ दुसऱ्या मित्रांची वाट पाहत होती. तेव्हा एक छोटा मुलगा आला त्याने सांगितले की कोणी तरी तुला कँडी पाठवत आहे. पाच मिनिटानंतर एक मोठा माणूस माझ्याजवळ आला आणि स्वतःला वापरलेल्या कारचा सेल्समन सांगितले. तेव्हा आम्ही एक दुसऱ्यांचे नंबर घेतले होते. एका आठवड्यानंतर त्याला फोन आला त्याने एका ट्रिपवर येण्याची विनंती केली आणि मी त्याच्यासोबत गेली. नंतर समजले की तो मानवी तस्कर आहे आणि मी त्यांच्या जाळ्यात अडकले आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.