हॉवरबोर्डवरून उडून बनविला नवा गिनिज रेकॉर्ड

राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला त्यापूर्वीपासून माणसाला पक्षाप्रमाणे आकाशात उडण्याचे स्वप्न आहे. आता हे स्वप्न मनुष्य अत्याधुनिक मशीनच्या साहाय्याने उडण्याचा प्रयत्न करीत आहे. 

Updated: Oct 16, 2015, 04:57 PM IST
हॉवरबोर्डवरून उडून बनविला नवा गिनिज रेकॉर्ड title=

मुंबई : राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला त्यापूर्वीपासून माणसाला पक्षाप्रमाणे आकाशात उडण्याचे स्वप्न आहे. आता हे स्वप्न मनुष्य अत्याधुनिक मशीनच्या साहाय्याने उडण्याचा प्रयत्न करीत आहे. 

नुकतेची एक बातमी आली होती की एका अमेरिकन कंपनीने जगातील पहिली उडणारी कार तयार केली आहे. अशा प्रकाराची पहिली प्रोटोटाइप म्हणजे आदिरूप कार असणार आहे. ती प्रत्यक्षात उपयोगात यायला अजून ८ ते १० वर्ष आहेत. 

पण, पक्षाप्रमाण हवेत उडण्याचा कारनामा करून दाखवला आहे. कॅप्टन अलेक्झाड्रू डुरू यांने हॉवरबोर्ड तयार करून पाण्याच्या समांतर उडण्याचा विक्रम केला आहे. त्याने २७५.९ मीटर म्हणजे ९०५ फूट आणि दोन इंच एका तलावावर उड्डाण केले आहे. कॅनडात केलेल्या या विक्रमात त्याने पाण्यापासून १६ फूट उंची पर्यंत आपला हॉवरबोर्ड उडविला होता. 

पाहा व्हिडिओमध्ये त्याची एक झलक

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.