हॉलिवूड अभिनेत्री सेलिना गोमेजला मोठ्या वयाच्या व्यक्तीशी करायचाय विवाह

गायिका, अभिनेत्री सेलिना गोमेज हिला वयाने मोठा असणाऱ्या व्यक्तीशी विवाह करायचा आहे. ई-ऑनलाइनच्या सूत्रानुसार २३ वर्षीय गायिका सेलिनाचे म्हणणे आहे, आपल्याला जास्त समजुतदार मोठ्या व्यक्तीशी विवाह करायचा आहे. त्यासाठी मी तयार आहे.

Reuters | Updated: Nov 28, 2015, 03:58 PM IST
हॉलिवूड अभिनेत्री सेलिना गोमेजला मोठ्या वयाच्या व्यक्तीशी करायचाय विवाह title=

लॉस अॅंजिलिस : गायिका, अभिनेत्री सेलिना गोमेज हिला वयाने मोठा असणाऱ्या व्यक्तीशी विवाह करायचा आहे. ई-ऑनलाइनच्या सूत्रानुसार २३ वर्षीय गायिका सेलिनाचे म्हणणे आहे, आपल्याला जास्त समजुतदार मोठ्या व्यक्तीशी विवाह करायचा आहे. त्यासाठी मी तयार आहे.

सेलिनाने यावेळी आपल्या मनातील भीती बोलून दाखवली. माझ्याकडे पाहिल्यावर वाटते मी कमी वयाची आहे. त्यामुळे माझी इच्छा अडचणीची वाटते. सेलिना अनेक वर्षे २१ वर्षीय जस्टिन बिबरबरोबर प्रेम संबंध होते.

मला अनेक वेळा वाटते मी १६ वर्षांची आहे. हे मत माझ्यासाठी वाईट आहे. कारण मी माझ्यापेक्षा मोठ्या वयाच्या व्यक्तीबरोबर संबंध जोडण्यासाठी तयारी करत आहे. यावर्षी सेलिना संगीत निर्माता जेडबरोबर नाव जोडले गेले होते. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार ती केवळ अफवाच होती. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.