हिटलरच्या सहकाऱ्याच्या डायरीत काय दडलंय?

जर्मनीचा हुकुमशहा अडॉल्फ हिटलर हा वादग्रस्त म्हणून ओळखला जातो. त्याच्या जवळच्या सहकाऱ्याची डायरी सापडलेय. या डायरीत काय दडलंय, याची तपासणी करण्यासाठी डायरी हस्तगत करण्यात आलेय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 11, 2013, 03:55 PM IST

www.24taas.com, झी मीडिया,वॉशिंग्टन

जर्मनीचा हुकुमशहा अडॉल्फ हिटलर हा वादग्रस्त म्हणून ओळखला जातो. त्याच्या जवळच्या सहकाऱ्याची डायरी सापडलेय. या डायरीत काय दडलंय, याची तपासणी करण्यासाठी डायरी हस्तगत करण्यात आलेय.
हिटलरचा सहकारी अल्फ्रेड रोझेनबर्ग याने लिहिलेली ४०० पानी डायरी हाती लागल्याचे अमेरिकन सरकारने सोमवारी जाहीर केलं. दुसऱ्या महायुद्ध काळातील ज्यूंवर झालेल्या अत्याचारामध्ये रोझेनबर्ग याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. रोझेनबर्ग याच्या हिटलरबरोबरील तसेच हिमलर व गोअरिंग या नाझी जर्मनीमधील इतर महत्त्वाच्या नेत्यांबरोबरील अधिक चांगला प्रकाश पडण्याची शक्य्ता या डायरीमुळे निर्माण झाली आहे.
या डायरीत रशियावर जर्मनीने केलेल्या आक्रमणाचा तपशील आणि तेथील ज्यू व पूर्व युरोपिअन लोकांना ठार करण्याच्या योजनेबद्दलची माहितीही असल्याचे सांगितले जात आहे. १९३६ते १९४४ दरम्यान नाझी घडामोडींचा तपशील या डायरीमध्ये असल्याचे स्पष्ट झाले असून न्यूरेंबर्ग खटल्यानंतर ही डायरी गायब झाली होती. न्यूरेंबर्ग खटल्यामधील वकिल रॉबर्ट केंपनेर याने ही डायरी अमेरिकेत परत पाठविल्याचा संशय अमेरिकेच्या तपास संस्थेस होता.

१९९३ मध्ये केंपनर याचे निधन झाल्यानंतर त्याच्या कागदपत्रांवरून त्याची मुले, पुरात्त्व संग्रहालय, त्याचा माजी सचिव यांच्यामध्ये कायदेशीर लढाई चालू झाली. केंपनर याची कागदपत्रे संग्रहालयास देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, या दफ्तरामधून हजारो कागदपत्रे गहाळ झाल्याचे निष्पन्न झल्यानंतर एफबीआयने याचा शोध चालू केला. त्यानंतर न्यूयॉर्क येथे हर्बर्ट रिचर्डसन या प्राध्यापकाकडे ही डायरी मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.