लेडी गागाची `नग्न योगासनं,`हिंदूंची दुखावली मनं!

अमेरिकेतील एका हिंदू संघटनेने पॉपस्टार लेडी गागाच्य़ा विरोधात निषेध नोंदवला आहे. लेडी गागाच्या नग्न व्हिडिओ अल्बमवर त्यांनी कडक टीका केली आहे. आपल्या व्हिडिओत लेडी गागाने नग्न होऊन योगासनं करत योगासनांची टर्र उडवल्याचं या हिंदू संघटनेचं म्हणणं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 14, 2013, 08:08 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन
अमेरिकेतील एका हिंदू संघटनेने पॉपस्टार लेडी गागाच्य़ा विरोधात निषेध नोंदवला आहे. लेडी गागाच्या नग्न व्हिडिओ अल्बमवर त्यांनी कडक टीका केली आहे. आपल्या व्हिडिओत लेडी गागाने नग्न होऊन योगासनं करत योगासनांची टर्र उडवल्याचं या हिंदू संघटनेचं म्हणणं आहे.
`हिंदू व्यापारी आणि युनिव्हर्सल सोसायटी ऑफ हिंदुइज्म`चे अध्यक्ष राजन जेड यांनी ९ ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या पत्रकात लेड़ी गागावर टीका केली आहे. लेडी गागाने नग्न होऊन योगासन करत योगासनांना लिव्हिंग फॉसिल्स (जिवंत राहिलेले अवशेष) म्हटलं आहे. योगासनांची परंपरा ही हिंदूंमध्ये कित्येक शतकांपासून चालू आहे. यामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभतं, हे पाश्चात्यांनीही मान्य केलं आहे. हे हिंदू तत्वज्ञानातील महत्वाचं अंग असून हिंदू संस्कृतीत त्याला मानाचं स्थान आहे. असं या पत्रकात म्हटलं आहे.
नग्न होऊन योगामुद्रा करणं हा आमच्या ज्ञानाचा अपमान असून ज्या ज्ञानाने मनुष्य आत्मा आणि विश्वात्मा यांच्यात अद्वैत साधलं जातं, अशा ज्ञानाचा अपमान करणं चूक आहे. अमेरिकेतही सुमारे २ कोटी लोक योगासनं करत असल्याचं स्पष्ट झालं असताना त्यांना लिव्हिंग फॉसिल्स म्हणणं हा संस्कृतीचा अपमान असल्याचं पत्रकात लिहिलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.