डर्टी गेम: इथं बक्षिस म्हणून मिळतात कुमारी मुली

आपल्याला माहितीय जगात अशाही जागा आहेत जिथं मुलींवर अत्याचार करण्यासाठी तिकीट विक्री होते. एवढंच नव्हे तर तिकीटवर बक्षिसही असतं. हे बक्षिस म्हणजे वर्जिन मुलगी...

Updated: Sep 18, 2015, 11:03 AM IST
डर्टी गेम: इथं बक्षिस म्हणून मिळतात कुमारी मुली title=

नवी दिल्ली: आपल्याला माहितीय जगात अशाही जागा आहेत जिथं मुलींवर अत्याचार करण्यासाठी तिकीट विक्री होते. एवढंच नव्हे तर तिकीटवर बक्षिसही असतं. हे बक्षिस म्हणजे वर्जिन मुलगी...

डेली मेलमध्ये आलेल्या एका रिपोर्टनुसार वासनांध लोकांना इथं सर्वकाही मिळतं. एक असं जग जिथं अत्याचारांना परिसिमा नसते. मुलींना एखाद्या वस्तूसारखं इथं विकलं जातं आणि कुमारिका मुली सर्वात जास्त किमतीला विकल्या जातात.

आणखी वाचा - विद्यार्थ्यांना दिलेली ही शिक्षा पाहून तुम्ही हळहळ व्यक्त कराल

हा घृणास्पद खेळ खेळला जातो ब्राझीलच्या एका गावात, ज्याचं नाव आहे एनक्रूजिहादा. इथं जगातील सर्वात घाणेरडा खेळ खेळला जातो जो पाहून आपण लज्जित व्हाल. इथं पुरुष तिकीट विकत घेतात नंतर बिंगो आणि तंबोला सारखे खेळ खेळले जातात.

रॅफरल तिकीटांमध्ये जो जिंकतो त्याला बक्षिस म्हणून मुलगी मिळते. मग त्या मुलींवर अत्याचार केला जातो. या तिकीटांची किंमत असते अवघे 500 रुपये. जो पुरूष पहिला क्रमांक पटकावतो त्याला वर्जिन आणि कमी वयाची मुलगी मिळते.

आणखी वाचा - व्हिडिओ - ब्राझीलमध्ये दोन महिलांनी चोरांना अशी घडवली अद्दल

धक्कादायक म्हणजे अवघ्या 11 वर्षांच्या मुलीही याच्या शिकार होतात. अतिशय गरीब असलेल्या या गावातील काही मुली खूप कमी पैशात स्वत:ला विकू देतात. दरम्यान, इथं अशा काही संस्था आहेत, ज्या या घाणेरड्या खेळाचा विरोध करतायेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.