महामंदीचा सोनेरी घाव, कमीच राहाणार सोन्याचा भाव

१५ एप्रिल २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी एका मेलद्वारे स्पष्ट केलं आहे, की भविष्यात सोन्याच्या दरात कपात होणार आहे. सोन्याच्या झळाळीला आता पूर्वीइतका भाव नसेल.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 21, 2013, 05:51 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, न्यूयॉर्क
१५ एप्रिल २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी एका मेलद्वारे स्पष्ट केलं आहे, की भविष्यात सोन्याच्या दरात कपात होणार आहे. सोन्याच्या झळाळीला आता पूर्वीइतका भाव नसेल.
सोन्याचा भाव गेल्या काही महिन्यांपासून उतरला आहे. देशभरात त्यामुळे सोने खरेदीसाठी लोकांनी ठिकठिकाणी गर्दी केली होती. मात्र जगभरात सोन्याचा भाव कमीच होणार असून सोन्याची महामंदी सुरू होणार आहे. ही मंदी पुढील बरीच वर्ष सुरू राहाणार आहे.
सध्याची सोन्याची मंदी हा पहिला धक्का आहे. येत्या काळात इतिहासातील सर्वात कमी किमतीत सोनं उपलब्ध होणार आहे.
त्यामुळे सोन्याला म्हणावी तशी किंमत नसेल. सोनं खरेदीसाठी धडपडणाऱ्या ग्राहकांना हा काळ चांगलाच फायद्याचा ठरणार आहे. मात्र गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करणाऱ्यांना वाट पाहावी लागेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.