दंड बसू नये म्हणून तरुणीची बसमधून उडी

बसच्या खिडकीमधून कधी तूम्ही कोणत्या मुलीला उतरतांना पाहिलं आहे का ? तुम्हाला प्रश्न पडला असेल की दरवाजा असतांना बसच्या खिडकीमधून उतरण्याची गरज काय ? पण असं घडलंय. एका तरुणींने चक्क बसच्या खिडकीतून  उतरण्याचा प्रयत्न केला आणि ती त्यात यशस्वीही झाली. 

Updated: Dec 21, 2015, 04:46 PM IST
दंड बसू नये म्हणून तरुणीची बसमधून उडी title=

मिंस्क : बसच्या खिडकीमधून कधी तूम्ही कोणत्या मुलीला उतरतांना पाहिलं आहे का ? तुम्हाला प्रश्न पडला असेल की दरवाजा असतांना बसच्या खिडकीमधून उतरण्याची गरज काय ? पण असं घडलंय. एका तरुणींने चक्क बसच्या खिडकीतून  उतरण्याचा प्रयत्न केला आणि ती त्यात यशस्वीही झाली. 

बेलारुस या पूर्व युरोपातील देशातील हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. बसमध्ये एक तरुणी विनातिकीट प्रवास करत असतांना तिकीट तपासनीसाठी आलेल्या टीसीला पाहुन आता दंड भरावा या भितीने बसच्या खिडकीमधूनच उडी मारली. 

व्हिडिओ पाहा बातमीच्या शेवटी

टीसीने या तरुणीकडून दंड मागितला पण तरुणीने बस सिंग्नलला थांबली असतानाच खिडकीतून उडी मारली आणि काही झालंच नाही असं दाखवत तेथून निघून गेली. याविरोधात बस प्रशासनाने तिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे, तर तरुणीनेही बस प्रशासनावर प्राणघातक हल्ला केल्याची तक्रार नोंदवली आहे. पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहे.