महिला खासदारासोबत ड्रग डिलरने घालवली ३१ डिसेंबरची रात्र

ड्रग डीलर एल चापो गजमान याला काही दिवसांपूर्वीच नेव्हीने अटक केली. पण काही दिवसांपूर्वी म्हणजेच ३१ डिसेंबर २०१५ ची रात्र या माफियाने एका महिला खासदारासोबत घालवल्याच्या बातमीने सगळीकडेच खळबळ माजली आहे.

Updated: Jan 18, 2016, 05:13 PM IST
महिला खासदारासोबत ड्रग डिलरने घालवली ३१ डिसेंबरची रात्र title=

मॅक्सिको : ड्रग डीलर एल चापो गजमान याला काही दिवसांपूर्वीच नेव्हीने अटक केली. पण काही दिवसांपूर्वी म्हणजेच ३१ डिसेंबर २०१५ ची रात्र या माफियाने एका महिला खासदारासोबत घालवल्याच्या बातमीने सगळीकडेच खळबळ माजली आहे.

महिला खासदार आणि एल चापोची २०१३ मध्ये एका पार्टीत भेट झाली होती. त्यानंतर काही दिवसातच महिला खासदारच्या पत्रकार पतीची हत्या झाली होती. या महिला खासदाराने एल चापोला याच्या एका मुलाला देखील जन्म दिल्याच्या चर्चा आहेत.

एल चापोला याला ७ महिलांकडून एकूण १८ मुले आहेत. ६ महिन्यापूर्वी चापोला हा जेलमधून फरार झाला होता. त्यानंतर तो ३५ डिसेंबर रोजी त्याच्या पत्नीसोबत आणि ३१ डिसेंबर रोजी खासदार लुसेरा सॅनचेझ यांच्यासोबत असल्याचं वृत्त आहे. 

२६ वर्षीय लुसेरा यांनी मात्र हे वृत्त फेटाळून लावले आहे. एल चापोशी माझा कुठलाही संबंध नसल्याचे लुसेरांनी म्हटलं आहे.