८० लक्झरी कार घेऊ युरोपमधून चीनला पोहचली कार्गो ट्रेन - पाहा व्हिडिओ

लक्झरी कारचे वेड जगाच्या कानाकोपऱ्यात पाहायला मिळते. हो या ठिकाणी आम्ही चीनबद्दल बोलतो आहे. युरोपवरून एक कार्गो ट्रेन १८ दिवसांचा प्रवास करत चीनच्या झेंगजिआयु येथे पोहचली. 

Updated: Dec 9, 2016, 05:55 PM IST
८० लक्झरी कार घेऊ युरोपमधून चीनला पोहचली कार्गो ट्रेन - पाहा व्हिडिओ  title=

नवी दिल्ली : लक्झरी कारचे वेड जगाच्या कानाकोपऱ्यात पाहायला मिळते. हो या ठिकाणी आम्ही चीनबद्दल बोलतो आहे. युरोपवरून एक कार्गो ट्रेन १८ दिवसांचा प्रवास करत चीनच्या झेंगजिआयु येथे पोहचली. 

चीनची ही पहिली कार्गो ट्रेन आहे की तिचा उपयोग युरोपातून लक्झरी कार आणण्यासाठी केला गेला आहे. या कार्गो ट्रेनमध्ये ८० कार होत्या. यात बेन्टली आणि लँड रोव्हर अशा कारचा समावेश होता. 

चीनची अग्रगण्य एजन्सी चायना शिन्हुआ न्यूज ट्विट नुसार १८ दिवसांच्या प्रवासानंतर युरोपातून एक कार्गो ट्रेन चीनला पोहचली आहे. यात केवळ गाड्याच होत्या. ही ट्रेन हेनान प्रांतातील झेंगजिआयु येथे ८० महागड्या गाड्या घेऊ आली. ट्रेन जर्मनीच्या हेम्बर्ग येथून सुटली होती.