फिफाच्या अध्यक्षपदी सेप ब्लॅटर यांची निवड

 फिफाच्या अध्यक्षपदी सेप ब्लॅटर यांची पुन्हा एकदा निवड झाली आहे. सेप ब्टॅलर यांची जागतिक फुटबॉल संस्था (फिफा)च्या अध्यक्षपदी पाचव्यांदा निवड झाली आहे.

Reuters | Updated: May 30, 2015, 12:27 PM IST
फिफाच्या अध्यक्षपदी सेप ब्लॅटर यांची निवड  title=

झुरिच : फिफाच्या अध्यक्षपदी सेप ब्लॅटर यांची पुन्हा एकदा निवड झाली आहे. सेप ब्टॅलर यांची जागतिक फुटबॉल संस्था (फिफा)च्या अध्यक्षपदी पाचव्यांदा निवड झाली आहे.

पहिल्या टप्प्यातील मतदानात सेप ब्लॅटर यांच्यासह त्यांचे प्रतिस्पर्धी जॉर्डनचे प्रिन्स अली बिन अल-हुसेन यांना दोन तृतांश बहुमत मिळाले नाही. यामुळे दुसऱ्या टप्प्याचे मतदान घ्यावे लागले. दरम्यान, अल-हुसेन यांनी माघार घेतली आणि दुसऱ्या टप्प्यात ब्टॅलर यांचे नाव अध्यक्षपदासाठी घोषीत करण्यात आले. ब्लॅटर (७९) हे १९९८ पासून फिफाच्या अध्यक्षपदावर आहेत.

जागतिक महासंघाच्या निवडणूक नियमावलीनुसार विजयी उमेदवारास वैध मताच्या दोनतृतीयांश मते न मिळाल्यास फेरनिवडणूक होते. पहिल्या फेरीत ब्लॅटर यांना १३३, तर त्यांचे प्रतिस्पर्धी प्रिन्स अली बिन अल हुसेन यांना ७३ मते मिळाली. एकंदर २०९  पैकी २०६ मते वैध ठरली होती. फेरनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेची तयारी सुरू असतानाच प्रिन्स अली बिन अल हुसेन यांनी निवडणुकीतून माघार घेतली आणि ब्लॅटर यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.