शिक्षिकेने चुकून सोशल मीडियावर पोस्ट केली, स्वतःची न्यूड सेल्फी

 एका रशियन संगीत शिक्षिकेने चुकीने आपली न्यूड सेल्फी सोशल नेटवर्किंग साइटवर टाकली आणि सर्वत्र खळबळ माजली. स्कूल अधिकारी आता तिच्याकडून राजीनाम्याची मागणी केली असून तिने असे करण्यास नकार दिला आहे.

Updated: Aug 19, 2014, 05:02 PM IST
शिक्षिकेने चुकून सोशल मीडियावर पोस्ट केली, स्वतःची न्यूड सेल्फी title=

तवेर :  एका रशियन संगीत शिक्षिकेने चुकीने आपली न्यूड सेल्फी सोशल नेटवर्किंग साइटवर टाकली आणि सर्वत्र खळबळ माजली. स्कूल अधिकारी आता तिच्याकडून राजीनाम्याची मागणी केली असून तिने असे करण्यास नकार दिला आहे.

रशियाच्या तवेर शहरात राहणाऱ्या एका अध्यापिकेने ऐलेना कोर्निशोन्कोवा (४०) ने सांगितले की, तिने चुकीने सोशल नेटवर्किंग साइट वकोन्टेकवर आपली न्यूड सेल्फी पोस्ट केली. मीडियातील बातम्यानुसार विद्यार्थ्यांनी आणि सहकाऱ्यांनी या साइटवर तिची नग्न सेल्फी पाहिली आणि याची माहिती शाळेच्या प्रशासनाला दिली.

शिक्षिकेने आपला बचाव करताना सांगितले, की अंग प्रदर्शन करणे काही चुकीचे नाही. माझे जीवन माझ्या इतर सहकाऱ्यांच्या तुलने अधिक सन्माननीय आहे. मी माझ्या काही जवळच्या मित्रांना ही सेल्फी दाखू इच्छित होती. जी स्पेनमध्ये सुट्टीच्यावेळी घेतली होती.

दरम्यान, शाळेच्या प्रशासनानने शिक्षिकेला २५ ऑगस्टपर्यंत राजीनामा देण्यास सांगितले आहे. असे नाही केले तर तिला बरखास्त करण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x