हायवेवरुन बेभान कारचालकाचा थरार, पोलिसांचा काढला दम

ऑस्ट्रेलियातल्या एका सतरा वर्षांच्या युवकानं बेदरकारपमे गाडी चालवत वाहतूक पोलिसांचा चांगलाच दम काढला. 

Reuters | Updated: Nov 14, 2015, 11:51 AM IST
हायवेवरुन बेभान कारचालकाचा थरार, पोलिसांचा काढला दम  title=

सिडनी : ऑस्ट्रेलियातल्या एका सतरा वर्षांच्या युवकानं बेदरकारपमे गाडी चालवत वाहतूक पोलिसांचा चांगलाच दम काढला. 

ताशी शंभर किलोमीटरहून जास्त वेगानं सतरा वर्षांच्या ब्रेडन ग्रिनफिल्ड यानं, वाहतुकीचे सर्व नियम मोडत हायवेवरुन गाडी पळवली. यामध्ये ओव्हरटेक करताना, एका ट्रॉलरचीही या बेभान कारचालकाला धडक बसली.

वाहतूक पोलीस तब्बल चाळीस मिनिटं त्याचा पाठलाग करत होते. मात्र तो सतत पोलिसांना हुलकावणी देत होता. बेभान झालेल्या चालकाचा पाठलाग करताना, हा सर्व थरार हेलिकॉप्टरमधून पोलिसांकडून शूट केला गेला. अखेर एका गटाराच्या कडेला त्याच्या गाडीची कोंडी करुन पोलिसांनी अखेर त्याला जेरबंद केला. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.